Sunday, 27 March 2022

 रंगांना सुद्धा आता कोडे पडायला लागले 

माझा नंबर कधी लागेल असे ते एकमेकां विचाराया लागले.

लाल म्हणाला मीच असेन पहिला कारण माझ्यात मी तिचा स्वभाव तो पहिला

हिरव्या रंगाला हे काही रुचले नाही कारण त्याने तिला कधी हिरमुसलेले पाहिले नाही.

गुलाबी रंगानी तर वेगळी शक्कल लावली माझ्या इतकी मॅचींग नाही तिच्या कडे हो कुठली

जांभळा मात्र हे ऐकून मनात हसला कारण शीतलता आपला गुण त्याला तिच्या मध्ये दिसला.

हे सारे सगळे एका व्यक्ती साठी घडाया लागले.

माझा नंबर कधी लागेल असे ते एकमेकां विचाराया लागले!!

सोनेरी मात्र ह्यात चतुर निघाला

 वरिष्ठ व्यक्ती कडून आदेश ह्याने आपला एक नियम तो लावला.

रंगांना हे समजताच सगळे त्यांना मात्र नवलच वाटले

आता जे येतील सणवार ते आपण वाटून घेऊ पाहिले

मात्र तिला ते सगळे तिच्या सारखे वाटाया लागले..

माझा नंबर कधी लागेल असे ते एकमेकां विचाराया लागले.!!

आयुष्यात रंगानी तिची साथ कधी सोडली नाही

म्हणून काय ती त्यांच्या वर किंचित ही रुसली नाही.

त्यांच्या मुळे तिचे सौंदर्य आणखी खुलायला लागले.

तिच्या सौंदर्याला रंगाची नाही गरज हे रंगांना ही देखील पटायला लागले

माझा नंबर कधी लागेल असे ते एकमेकां विचाराया लागले!!

 जुनेच messege पुन्हा वाचत असतं कुणीतरी...

पावसाच्या थेंबात अश्रु लपउन रडत असतं कुणीतरी ...

कुणालातरी हसताना लपून बघत असत कुणीतरी...

दिवे सगळे विज़ल्या वरही का जळत असत कुणीतरी...

सगळे जग झोपले असताना उघड्या डोळ्यानी स्वप्न बघत असत कुणीतरी...

कुणी येणार नाही तरी वाट बघत का असत कुणीतरी...

माणसाच्या या इतक्या गर्दित का एकटं असत कुणीतरी...


-अमन कांबळे

क्षण

 रोजच्या ह्या धावपळीत भरपूर न काही होते न काही होणार 

आयुष्यातले हे क्षण मला न जगता येणार……। 

शाळा कॉलेज मध्ये नेहमीच समोरच्या बाकावर बसणार 

कधी मागे बसून हि मीच भीत राहणार 

 आयुष्यातले हे क्षण मला न जगता येणार……।

 असेभरपूर मी बडबड करणारा काव्य अन चरोळी लिहणारा 

 पण मनातून चिरंतन शांत 

 स्वतच्या सुखाच्या स्वतच्या दुखाशी बेरीज-वजाबाकी नेहमीचमाझा वेळ दवडणार 

 आयुष्यातले हे क्षण मला न जगता येणार……।

 रुसव्या खूप पलिकडची ती अन मानव्याच्या खूप अलीकडचा मी 

 दोघे जण वेगवेगळ्या तीरावरचे प्रवासी 

 ह्या दोघांच्या भांडणात नेहमीच तिसरा चा लाभ होणार 

 आयुष्यातले हे क्षण मला न जगता येणार……।

अमन कांबळे

कुणीतरी....

प्रेम मात्र करायच मात्र राहून गेलं

 निरंतर तुझ्यात तुला शोधताना !

स्वत: ला मात्र शोधायचं राहून गेलं !!

खुप सार होतं मनात पण प्रेम करायच मात्र राहून गेलं!!!

आठवणीचे कोडे उलगडताना ,

मनात विचारांचा कल्लोळ असताना,

प्रश्नांच्या भल्या उंच उतरंडीत ,

खरं उत्तर शोधायचं राहून गेलं!!

खुप सार होतं मनात पण प्रेम करायच मात्र राहून गेलं!!!

धाम धुमीच्या आयुष्यात वेळे मागे धावताना,

एकानंतर एक दुःखाचे डोंगर सर करताना

तुझ्या मनातील रुसव्याला मनवण मात्र राहून गेलं!

खुप सार होतं मनात पण प्रेम करायच मात्र राहून गेलं