रंगांना सुद्धा आता कोडे पडायला लागले
माझा नंबर कधी लागेल असे ते एकमेकां विचाराया लागले.
लाल म्हणाला मीच असेन पहिला कारण माझ्यात मी तिचा स्वभाव तो पहिला
हिरव्या रंगाला हे काही रुचले नाही कारण त्याने तिला कधी हिरमुसलेले पाहिले नाही.
गुलाबी रंगानी तर वेगळी शक्कल लावली माझ्या इतकी मॅचींग नाही तिच्या कडे हो कुठली
जांभळा मात्र हे ऐकून मनात हसला कारण शीतलता आपला गुण त्याला तिच्या मध्ये दिसला.
हे सारे सगळे एका व्यक्ती साठी घडाया लागले.
माझा नंबर कधी लागेल असे ते एकमेकां विचाराया लागले!!
सोनेरी मात्र ह्यात चतुर निघाला
वरिष्ठ व्यक्ती कडून आदेश ह्याने आपला एक नियम तो लावला.
रंगांना हे समजताच सगळे त्यांना मात्र नवलच वाटले
आता जे येतील सणवार ते आपण वाटून घेऊ पाहिले
मात्र तिला ते सगळे तिच्या सारखे वाटाया लागले..
माझा नंबर कधी लागेल असे ते एकमेकां विचाराया लागले.!!
आयुष्यात रंगानी तिची साथ कधी सोडली नाही
म्हणून काय ती त्यांच्या वर किंचित ही रुसली नाही.
त्यांच्या मुळे तिचे सौंदर्य आणखी खुलायला लागले.
तिच्या सौंदर्याला रंगाची नाही गरज हे रंगांना ही देखील पटायला लागले
माझा नंबर कधी लागेल असे ते एकमेकां विचाराया लागले!!
No comments:
Post a Comment