घटनातज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतीज्ञ, समाजशास्त्रज्ञ, वकील, लेखक, संपादक, शिक्षणतज्ञ, वक्ता, धर्मज्ञ, क्रांतिकारक, समाज सुधारक,महिला उद्धारक, व्यासंगी विचारवंत, प्रखर राष्ट्रभक्त ....
मी स्वतः जातीप्रथेचेनिर्मुलन(Annihilation ऑफ caste) वाचत असताना मला जाणवलं की एका समाजसुधारक ह्यांनी तयार केलेले भाषणाचे रूपांतर पुढे सगळ्यात प्रसिद्ध पुस्तकात होते आणि पुढे तेच घटनेचे शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारक महामानव झाले .
एक एक गुणवत्ता मिळवण्यासाठी माणसं आपलं पूर्ण आयुष्य खर्ची घालतात आणि इतकं करूनही त्या क्षेत्रातील उच्च स्थान मिळतेच असे नाही. तरीही जे मिळते त्याचा बरेचदा प्रचंड अहंकार असतो
पण बाबासाहेबांनी एकाच आयुष्यात या सर्व गुणवत्ता मिळवल्या आणि केवळ मिळवल्याच नाही तर त्या विषयात उच्च मानदंड इतका प्रस्थापित केला की ज्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठ मध्ये त्यांनी शिक्षण घेतले तिथे त्यांचं स्मारक उभा राहील आणि ते symbol of knowledge झाले.
बाबासाहेब प्रज्ञा सूर्य आणि महीला उद्धारक ठरतात ते यामुळे.
आपले वैचारिक गुरू महात्मा फुले ह्यांचा वारसा पुढे नेत अस्पृश्यतेच्या भयाण अंधःकारातून समाजातील फार मोठ्या दुर्लक्षित घटकाला आणि सर्व महिलांना बाहेर काढलं. त्याच आज फलित म्हणून श्रीमती द्रौपदी मुर्मु ह्या अनुसूचित जनजाती असून सुद्धा महामहीम राष्ट्रपती झाल्या. शककर्त्या शालिवाहनाप्रमाणे खऱ्या अर्थाने त्यांच्या जगण्यात प्राण ओतले. 'उद्धरली कोटी कुळे । भीमा तुझ्या जन्मामुळे'.
बाबासाहेब विश्व-वंदनीय ठरतात ते यामुळे.
आपल्या सर्व गुणवत्तांचा उपयोग करून वैयक्तिक आयुष्यात वाट्टेल ते त्यांना मिळवता आलं असत. पण ह्या सगळ्याकडे पाठ फिरवून, स्वतःच्या आणि परिवार च्या सुखदुःखाची किंचित पर्वा न करता आपलं सगळं कर्तृत्व त्यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी पणाला लावलं.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दांत सांगायचं तर 'गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे' असं बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन होतं.
बाबासाहेब अनुकरणीय ठरतात ते यामुळे.
कोणत्याही मानवाचे मूल्यांकन त्याने आयुष्यात काय केले, काय मिळवले यावरून केले जाते. पण काही माणसे आपल्या कार्याचा ठसा काळावर असा काही उमटवतात की पुढची कितीतरी शतकं, राष्ट्राच्या पिढ्या न् पिढया त्यांच्या अनुयायी बनून त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालत राहतात.
बाबासाहेब महामानव ठरतात ते यामुळे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेले, समतायुक्त-शोषणमुक्त-एकात्म समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः 395 कलम आणि 22 परिशिष्ट ह्यांची राज्यघटना तयार करून सर्व घटकांना मूलभूत अधिकार दिले .आपले अधिकार आणि कर्तव्य आपण समजून घेऊन राष्ट्र उभारणी साठी प्रयत्न करणे हीच आजच्या जयंती दिनी बाबासाहेबांना मानवंदना.
शब्दांकन
प्रा.अमन भिमराव कांबळे
MIT ADT University Loni pune

.jpeg)

