महात्मा ज्योतिबा फुले , राजर्षी शाहू महाराज आणि डॉ .बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय साठी उभारण्यात आलेल्या शिक्षण चळवळीला सामर्थ्याने पुढे नेत आणि माजी राज्यपाल पद्मश्री डॉ .डी वाय.पाटील ह्यांच्या दिव्य स्वप्नातून साकारण्यात आलेल्या डॉ .डी वाय.पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्स आकुर्डी पुणे चे चेअरमन नामदार श्री सतेज उर्फ बंटी पाटील सर ह्यांना ५० व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा .
त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करताना त्यांचे सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक आणि प्रशासकीय अष्टपैलू व्यक्तीमत्व ह्यावर किंचित सा प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न असेल.
एक संयमी आणि लोकाभिमुख राजकारणी म्हणूंन ओळख असणारे सतेज पाटील सर हे त्यांच्या उच्चशिक्षित आणि अगदी महाविद्यालय पासूनच राजकारण क्षेत्रात सक्रिय सहभाग ह्यामुळे वेगळे दिसतात .
त्यांची लोकांबद्दल असणारी जवळीक हि कोल्हापूर च्या जनतेला नेहमीच जाणवत असते . त्यांचे राजकारण हे तिथल्या सर्वच जनतेच्या कल्याणासाठी असते हि तेथील लोक स्वतः सांगतात .
कोल्हापूर सोबत कोकण भूमी वर आलेल्या अस्मानी संकटाला भिडताना आपल्या स्वतःच्या प्रकृतीची किंचित हि काळजी न-करता एका होडीत बसून लोकांसाठी मदत करणाऱ्या ह्या व्यक्तीमत्वाला पाहताना माझे हि अश्रू उभे राहिले .
स्वतः एवढ्या मोठ्या राजकीय कुटुंबात जन्म घेऊन सुद्धा त्याच्या मोठेपणाचा थोडा हि गंध त्यांच्या वागणुकीत महाराष्ट्राने कधी पहिला नाही. साधी राहणी आणि सुसंकृत व्यक्तीमत्व हे त्यांचं वेगळपण महाराष्ट्राने अनुभवलं आहे.
शैक्षणिक कार्या ला पुढे नेत त्यांनी १४ लाख विद्यार्थ्यांना ६५ लाख वह्या पुस्तके ची केलेली मदत करताना लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांचा कार्याची नोंद घेत केलेला गौरवशाली सन्मान आहे .
कोल्हापूरच्या मायभूमीमध्ये स्वराज्य सौदामिनी ताराराणी च्या कार्याचा इतिहास सांगताना महिला सबलीकरणासाठी केलेले हजारो बचत गट हे उल्लेखनीय आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गाव जत्रे पासून ITहब चे लोकार्पण असो वा विमानतळाची निर्मिती प्रत्येक कामात जिकरीने लक्ष घालत आणि स्वतःच्या यशाचे विक्रम मोडीत आणि लोककल्याणाचा वास मांडत श्री. सतेज सर आव्हानांना सामोरे जात आहेत .
आयुष्यचं अवघं अर्धे शतक पूर्ण करून विकासाच्या अनेक शतकवीर सलामी देणाऱ्या श्री सतेज उर्फ बंटी पाटील सर ह्यांना ५० व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा .
शब्दांकन
श्री अमन कांबळे
Computer engineering Department
No comments:
Post a Comment